.

आमच्याविषयी थोडसं...

Rasta Peth- vadhuvaronline.com, 155,156 parmar Apartment, NR K.E. M. Hospital , Shiral sheth Chowk, Rasta Peth Pune411011 Maharashtra (India)
फोन: +91996017776
+91 9730816775

यंदा कर्तव्य आहे सन २००३ पासून विवाह विषयक सल्ला व सेवा तसेच इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात तर आघाडीवर आहेच, शिवाय ग्राहक संस्थांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, व्यक्तीमत्व विकास व कौशल्य विकास मार्गदर्शन, कार्पोरेट मीटिग्ज आदींचे आयोजनही करते. यातून ग्राहक संस्थांची उत्पादनक्षमता परिणामकारकरीत्या वाढीस लागलेली निदर्शनास आली आहे, या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो.

भारतीय संस्कृतीमधील अविभाज्य समजली जाणारी विवाह संस्था, शतकानुशतके अस्तित्वात आहे. एक विवाह केवळ दोन व्यक्तीच नव्हे तर अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करीत असतो. म्हणूनच लग्नाचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असतो. आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रीय लोकांमध्ये अलीकडच्या काळात त्याबाबतची सजगता वाढली असली तरी सुयोग्य वधुवराची निवड ही तितकीच जिकिरीची प्रक्रिया बनलेली आहे. या पार्श्वभूमीवर, खर्‍या अर्थाने मित्रवजा मार्गदर्शकाची भूमिकादेखील विश्वासनीय व्यक्ती अथवा संस्थाच उत्तमरीत्या बजावू शकतात. यातूनच वधुवर ऑनलाईन डॉट कॉम् हे विवाहविषयक मार्गदर्शन व संशोधन केंद्र अभिनव पद्धतीने विकसित केले आहे.

आमचं मिशनः
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अभिनव संकल्पना, दर्जेदार आणि तत्पर सेवेच्या माध्यमातून ग्राहकहितार्थ यशस्वीरित्या राबविणे व त्यातून समाजहित व अंतिमतः राष्ट्रहित साधणे.

आमचं वेगळंपणः
कोणत्याही प्रकल्पाची आखणी ते अंमलबजावणी या सर्व टप्प्यांमध्ये नियोजनबद्धता, विश्वसनीयता, तत्परता आणि परिणामकारकता राखणे याकडे आमचा कायम कटाक्ष असतो. म्हणूनच, आमच्या सर्व प्रयत्नांना यश लाभते व त्यातूनच ग्राहकाचा विश्वास जडतो, तो कायमपर्यंत टिकतो. आमच्याशी संबंधित हजारो ग्राहकांना याचा अनुभव आहेच...हवे तर आपणही खात्री करुन घेऊ शकता.

स्थळ शोधमोहिम